सावित्रीबाई फुले विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 

लोकदर्शन जील्हाप्रतीनिध 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर दिनांक ६जुलै
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
-सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक १ ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे ज्येष्ठ शिक्षिका ज्योती चटप ह्या होत्या. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्रमुख अतिथींनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याची व साहित्याची आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या त्यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना विषद केली सदर कार्यक्रमाचे संचालन नामदेव बावनकर यांनी तर आभार राजेश मांढरे यांनी मानले कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here