राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने काँग्रेसचा जल्लोष. ♦️एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 6 जुलै गुजरात न्यायालयाने मार्च महिन्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या सुनावणी नंतर त्यांचे खासदारकीचे पद रद्द करण्यात आले होते. या निर्णयास राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली.त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राहुल गांधी यांचा खासदारकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा, संविधानाचा विजय झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी संपूर्ण देशभरात फटाके फोडून,पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत उरण तालुका व उरण शहरच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी मिलिंद पाडगावकर-वरिष्ठ उपाध्यक्ष रायगड जिल्हा, विनोद म्हात्रे उरण तालुकाध्यक्ष,प्रकाश पाटील अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,कमलाकर घरत अध्यक्ष रायगड जिल्हा सेवादल,सुनील काटे काँग्रेस कार्यकर्ते,सदानंद पाटील केगाव विभागीय अध्यक्ष,गोपीनाथ मांडेलकर अध्यक्ष उरण तालुका सेवादल,प्रकाश पाटील अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,अफशा मुखरी अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी,चंदा मेवाती,बबन कांबळे,भालचंद्र घरत अध्यक्ष विधानसभा मतदारसंघ तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here