by : Shankar Tadas
गडचांदुर : शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह निमित्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह होते.यावेळी मार्गदर्शक करताना त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले तसेच ग्रामीण स्तरावर या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या.यावेळी प्रास्ताविकातून गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने शालेय स्तर, महाविद्यालय स्तर यांची विभागणी तसेच पदवीधर अभ्यासक्रमाची रचना, परीक्षेचे स्वरूप यावर त्यांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे आयोजक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.शरद बेलोरकर यांनी केले व एकदिवसीय कार्यशाळेची भूमिका विशद केली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनील बिडवाईक व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रसिंह यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेला महाविद्यालयातील पदवीचे सर्व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यशाळेचे आभार डॉ. शरद बेलोरकर यांनी मानले.