लोकदर्शन नाशिक 👉 मोहन भारती
मूळ शिंदखेडा येथील रहिवासी सध्या नाशिकच्या येथे सिडको परिसरात राहणारे राष्ट्रवादी कामगार सेल नाशिक शहर कार्याध्यक्ष श्री. प्रांजल विसपुते यांची कन्या अडीच वर्षीय नायरा विसपुते या चिमुकलीने शेकडो संस्कृत श्लोक, आरती, हिंदी मराठी गीतांचे पाठांतर करून सादरीकरण. तसेच २०० हून अधिक वस्तूंची ओळख सांगून इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदविल आहे. तिच्या या यशाबद्दल आज नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तिचा मेडल, प्रशस्तीपत्र, बुके देऊन सन्मान केला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी नायराचे कौतुक करत तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच संपूर्ण परिवारासोबत हितगुज केले. नायराच्या या यशामागे तीची आजी जयश्री विसपुते यांचा खुप मोठा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या संस्करा मुळेच ती घडत आहे असे वडील प्रांजल विसपुते यांनी माहिती देताना सांगितले आहे. चिमुकल्या नायराचे सर्व स्थरावरून कौतुक होत आहे.