पक्षपात करणारे , व कर्त्यव्यात कसूर करणारे श्री अनुप भगत यांच्या विरूध्द निलंबनाची कारवाई करण्यात यावी ÷ अरूनभाऊ डोहे

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

गडाचांदुर दि.३जुलै प्रभाग क्र 2 मध्ये दलितांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे या प्रभागात एक दलीत व दुसरा ओबीसी असे दोन नगरसेवक आहेत.
दलीत वस्ती सुधारन्या करीता शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे .विशेष निधीची तरतूद करीत आहे. परंतु प्रशासनात आपल्या नगर परिषद मधील बांधकाम विभागातील अधिकारी श्री अनुप भगत सारखे पक्षपात, कर्त्यव्यात कसूर, व कामात हयगय,करीत असलेले अधिकारी असल्याने दलीत भागातील विकास पूर्णपणे खुंटला आहे. व शासनाचा हेतू साध्य होण्यास बाधा निर्माण होत आहे.
विशेष प्रभाग क्रं 2 मधील सर्व्ह. न .104 चे ओपन स्पेस चे सौंदरीकरना करीता मार्च 2020 मध्ये ठराव घेवून 77 लक्ष रुपयाचे अंदाजपत्रक तयार करून आवश्यक मंजुरी घेवून मे 2021 मध्ये काम श्री भूषण इटनकर यांना देण्यात आले होते. कार्यादेश देताना सदरचे काम सहा महिन्यात पूर्ण कारायचे असे नमूद आहे.परंतु अजून पर्यंत काम सुरू करण्यात आले नाही.वारंवार विचारणा केली असता केवळ टाळाटाळीचे उत्तर दिले जात होते.मागील आठ महिन्यांपूर्वी सभागृहात विचारणा केली असता त्या परिसरातील नागरिकांनी काम करण्यास मनाई केली असल्याची खोटी माहिती श्री अनुप भगत यांनी पुरविली.जेव्हा की कोणत्याही नागरिकांनी कुठला आक्षेप घेतला नाही. वा काम थांबवले नाही.
असे असताना मा नगराधक्षा यांनी सदरचे काम न करता त्याच प्रभागांतील इतर ओपन स्पेस मध्ये करण्यात यावे असे सुचवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here