अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धे मध्ये महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस, गडचांदूर येथील विध्यार्थिनीची निवड*

 

लोकदर्शन 👉 प्रा.गजानन राऊत

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस, गडचांदूर तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर मधील बी.एससी. तृतीय वर्षातील कु. अस्मिता वाघमारे हिची सुंदर नगर, हिमाचल प्रदेश येथे दिनांक 5 ते 7 ऑगस्ट 2023दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु. अस्मिता वाघमारे हिच्या निवडीसाठी महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायंस, गडचांदूर चे शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. अनिस खान यांनी विशेष प्रयत्न केले व तिला योग्य मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा प्रशिक्षणासाठी ते मार्गदर्शन करीत असतात तसेच विध्यार्थ्यां ना प्रोत्साहित करीत असतात.अस्मिता वाघमारे ची क्रिकेट खेळा साठी निवड झाल्या मुळे या भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. अधिकाधिक विद्यार्थी खेळत रुची घेतील. महाविद्यालया चे प्राचार्य, शिक्षक शिक्षकेत्तर वृंद आणि गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी कु. अस्मिता वाघमारे हिचे कौतुक आणि हार्दिक अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here