माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत भटके मुक्त हक्क परिषद महाराष्ट्र चे पदाधिकारी यांची शासकीय बैठक संपन्न

लोकदर्शन मुंबई👉 महेश गिरी

दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी विधान भवन मुख्यमंत्री समिती कक्ष येथे दुपारी 5 वाजता भटके विमुक्त समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नांवर माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व विविध विभागाच्या सचिव व संचालकांच्या समवेत भटके विमुक्त हक्क परिषदेचे पदाधिकारी यांची बैठक आज संपन्न झाली
सदर बैठकीत चर्चेत घेण्यात आलेले मुलभूत प्रश्न खालील प्रमाणे
1) केंद्रातील सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानुसार समस्त भटक्या विमुक्तांचे सर्वेक्षण करणे ( आदेश दि. 18 ऑगस्ट 2020)
2) यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजना ग्रामीण व शहरी दोन्ही विभागास लागू करणे
3) जातीच्या प्रमाणपत्रा संबंधित 2008 च्या जीआर मध्ये बदल करून पुनर्जीवित करणे
4) महा ज्योती संस्थेअंतर्गत परदेशी स्कॉलरशिप मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाचा समावेश करणे
5) लोककलावंतांच्या मानधनात वाढ करणे व लोक कलावंत महामंडळाची स्थापना करणे
6) वसंतराव नाईक विकास महामंडळ 500 कोटीचे अनुदान देणे
7) सर्कस मैदान अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील भटक्या विमुक्त समाजाच्या वसाहतीचे पुनर्वसन करणे
8) धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना लागू केलेल्या नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देण्याचे योजनेमध्ये भटके विमुक्तांच्या इतर अ ब ड प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करणे
9) दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे
वरील प्रश्ना वर मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर 2 तास चर्चा करण्यात आली. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी न्याय देण्यासाठी योग्य ते निर्णय घेऊन भटके मुक्तांच्या सर्वांगीण विकासासाठी आह्मी सर्व प्रयत्न असे आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना दिले.
तसेच संबंधित विभागाच्या सचिव व संचालकांना तसे आदेशही निर्देशित केले
प्रथमताच भटक्या विमुक्त या वंचित समाजाच्या मूलभूत प्रश्ना संदर्भात माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे खूप संवेदनशील आहेत याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांना या बैठकीमध्ये झाली.
पुढील काळातही भटक्या विमुक्त या वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन माननीय मुख्यमंत्री यांनी सदर बैठकीत दिले.
या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाचे माननीय मंत्री श्री अतुलजी सावे साहेब, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार साहेब उपस्थित होते तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, सांस्कृतिक विभागाचे सचिव विधी व न्याय विभागाचे सचिव तसेच संबंधित इतर संबंधीत विभागांचे संचालक देखील उपस्थित होते
सभेच्या शेवटी हक्क परिषदेचे अध्यक्ष माननीय प्रा.श्री धनंजय ओंबासे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले
या बैठकीस महाराष्ट्राच्या सर्व विभागातून भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्रचे विविध पदाधिकारी- राज्यसचिव प्रा.श्री सखाराम धुमाळ, उपाध्यक्ष श्री कृष्णा जाधव सर, युवा आघाडी अध्यक्ष श्री प्रत्तिक गोसावी, विदर्भ विभाग अध्यक्ष श्री महेश गिरी, कला व सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष श्री लहू ढवळे, महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती कोमल वर्दे, उत्तर महाराष्ट्र विभाग संघटक श्री अशोक गिरी, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष श्री नागेश जाधव,डॉ श्री प्रसाद ओंबासे, श्री राजेश बोड्रे, श्री शिवदास वाघमोडे,श्री विलास गरदरे यांनी उपस्थित राहुन विवीध मूलभूत प्रश्नांच्या अंमलबजावनासाठी आपले अभ्यासपूर्ण म्हणने मांडले
महेश बबनराव गिरी (विदर्भ अध्यक्ष -भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *