राजुरा येथे महसूल दिन उत्साहात : आ. सुभाष धोटेंच्या हस्ते उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– तहसील कार्यालय राजुरा येथे महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच महसूल दिनाचे औचित्य साधून अधिकारी यांचे उत्कृष्ट कार्यामुळे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच तहसील कार्यालयातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांनी विविध क्षेत्रात प्रथम आल्यामुळे प्रमाणपत्र त्यांना प्रमाणपत्र देऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, राजुरा चे तहसिलदार ओमप्रकाश गौड, कोरपना चे तहसीलदार प्रकाश वऱ्हाटकर, जिवती चे तहसीलदार सेमटकर, गटविकास अधिकारी राजुराचे हेमंत भिंगारदेवे, जिवतीचे भागवत रेजीवाड, कोरपनाचे पेंदाम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे गुणवंत विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here