जिल्हाधिकाऱ्यांनी केली शहराच्या पूरग्रस्त भागाची पाहणी

by : Devanand Sakharkar

चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर शहरात गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरी भागात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने त्या नागरिकांना चंद्रपूर महापालिकेच्या विविध शाळेत स्थलांतरित करण्यात आले. शहरातील या पूरग्रस्त भागाला जिल्हाधिकारी विनय गौडा, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीपाल यांनी भेट देऊन पूरपिडीत नागरिकांशी संवाद साधला.

जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील रहमत नगर महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा आणि विठोबा खिडकी या परिसराला भेट देऊन आश्रयास असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पूरग्रस्त नागरिकांना जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. नागरिकांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, निवारा तसेच स्वच्छता अतिशय चांगल्या पद्धतीची असावी, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

 

*पूर परिस्थितीमुळे आश्रयास असलेल्या नागरिकांची संख्या* : चंद्रपूर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शहरातील 143 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले असून सद्यस्थितीत एकूण 615 नागरिक आश्रयास ठेवण्यात आले आहे. यात म. ज्योतिबा फुले प्रा. शाळेत 35 कुटूंब, नागरीक संख्या 149, घुटकाळा येथील किदवाई शाळेत 20 कुटूंब, नागरीक संख्या 82, लालपेठ येथील

माना प्रा. शाळेत 11 कुटूंब, नागरीक संख्या 52,

नागाचार्य मंदिर, महाकाली वार्ड येथे 10 कुटूंब, नागरीक संख्या 40, महाकाली प्रा. कन्या शाळेत 48 कुटूंब, नागरीक संख्या 212,

आणि शहीद भगत सिंह शाळेत 19 कुटूंब,  नागरीक संख्या 80, असे एकूण 143 कुटूंबातील 615 नागरिकांचा समावेश आहे.

#chandrapurnews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here