लोकदर्शन चंद्रपूर 👉दिनेश झाडे
कोरपना:-कोरपना तालुक्यातील माणिकगड डोंगर पायथ्याशी तसेच निसर्ग रम्य वन वैभवशाली हिरव्या शालू ने नटलेले निसर्ग रम्य पकडी गड्डम हे ठिकाण असून यापूर्वी वन विभागाकडून वन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते या भागातील अनेक दिवसापासून पर्यटन स्थळ विकसित करावे अशी मागणी आहे कोरपणा भागातील तेलंगाना सीमा यवतमाळ जिल्हा तसेच कोरपणा भागातील चार सिमेंट उद्योग कोळसा खाणी या भागात असल्याने निवांत वृक्ष निसर्गरम्य भागात पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित आहे यापूर्वी गडचांदूर लगत अमलनालापर्यटन विकासाकरिता पाटबंधारे विभागाने सात कोटी रुपये निधी खर्च करून पर्यटकांना भुरळ घालेल अश्या पद्धतीनेसोयी सुविधा उपयुक्त व निसर्ग रम्य आनंद घेण्यासाठी उपयुक्त असे बांधकाम करण्यात आले आहे पकडी गड्डम हे देखील प्रदूषण पर्यावरण मुक्त जल जंगल जमीन असे आनंददायी वातावरणात हे क्षेत्र असल्यामुळे लोकांसाठी पर्यटकांना उपयुक्त असे ठिकाण आहे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली असता जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना पर्यटन दर्जा घोषित करण्याकरिता जिल्हा नियोजन समिती समोर मान्यता करिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे या भागात धार्मिक स्थळ धानाई मंदीर कुसळ दर्गाह घाटराई आदिवासी चे काराई गौराईधार्मिक स्थळ या ठिकाणी असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या उपलब्ध असलेल्या जागेवर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आवश्यक ते निधी उपलब्ध करून द्यावा व पर्यटन स्थळ घोषित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी केली आहे