महिलांवरील अन्याय खपवून घेणार नाही :- गजानन पाटील जुमनाके* *♦️जिवती येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी तथा मूळनिवासी एकता संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा*

लोकदर्शन 👉 संकेत कुळमेथे

जिवती :- तालुक्यातील आंबेझरी येथे एका अल्पवयीन आदिवासी कोलाम समाजाच्या मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे आणि मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढल्याची घटना देशभर गाजत आहे. या दोन्हीही घटनेच्या निषेधार्थ गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा तथा मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीच्या वतीने शेकोडो समाज बांधवांच्या उपस्थितीत जिवती तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

महिलांवर सातत्याने देशभरात अन्याय अत्याचार व बलात्काराचे प्रकरण समोर येत आहे, महिलांची आदर करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीला मूठ माती देऊन देशभरात महिलांवरील बलात्काराचे प्रकरण हे निंदनीय आहे तरीसुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आरोपींची कसलीही चौकशी न करता फासावर चढवण्यात यावे, त्याशिवाय देशभरातील महिलांवर अत्याचार कमी होणार नाही. मणिपूर राज्यातील आणि जिवती तालुक्यातील आंबेझरी येथील प्रकरण अतिशय निंदनीय आहे, माणुसकीला काळिमा फसणाऱ्या दोन्ही घटना आहे, त्याचा सरकारने आणि प्रशासनाने तातडीने निकाल लावावा, महिलांवर होत असलेले अत्याचार आम्ही कदापि खपवून घेणार नाही अन्यथा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन उभे करू असा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नेते गजानन पाटील जुमनाके यांनी दिला.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्या सतलूबाई जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह मडावी, माजी सभापती भीमराव मेश्राम, माजी उपसभापती महेश देवकते, राज गोंडवाना गड संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकांबळे, नगरसेवक ममताजी जाधव, क्रिष्णा सिडाम यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

या मोर्चाचे यशस्वी आयोजन मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवतीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मुख्य सल्लागार लिंगोराव सोयाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष कंटू कोटनाके, भारी ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके, पाटण ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे, युवानेते मंगेश पंधरे यांच्या सह सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here