ढग फुटी अतिवृष्टी झाल्या मुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्या,, ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️तालुका काँग्रेस पक्ष ची मागणी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,  

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉.प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यात ढग फुटी होऊन अतिवृष्टी झाल्या मुळे नाल्या लगत असणाऱ्या शेतातील उभे पीक गाडल्या गेले व पीक अती पाऊसाने खरवडून गेले.
शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
तात्काळ शेतीचे पंचनामे करून हेक्टरी रुपये 50000/हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली आहे ,
मा.तहसीलदार कोरपना यांचे मार्फत मा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना
श्री विजयराव बावणे महासचिव काँग्रेस कमिटी चंद्रपूर श्री उत्तम पेचे अध्यक्ष तालुका काँग्रेस कोरपना श्री संबाजी कोवे माजी उपसभापती श्री संजय जाधव माजी उपसरपंच श्री विजय चिकटे श्री तुकाराम नगराळे उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here