चंद्रपूर जिल्ह्यात दोन मतिमंद मुलींवर अत्याचार

लोकदर्शन
चंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन मतिमंद मुलींवर अत्याचाराच्या घटना नुकत्याच घडल्या. याप्रकरणी दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा गावची मतिमंद मुलगी गावाबाहेर गेली असता विवेक विठ्ठल वडुले (28) याने तिला एकटी पाहून अत्याचार केला. याबद्दल मुलीच्या घरच्या मंडळीने पोलिसांत तक्रार दिली असता आरोपी विवेक वडूले याला अटक करण्यात आली आहे.
अन्य एक घटना जिवती तालुक्यात घडली. आदिवासी बहुल भाग असलेल्या जिवती तालुक्यातील आंबेझरी गावातील १९ वर्षीय आदिवासी मतीमंद मुलींवर अतिप्रसंग करण्यात आला. सदर नराधमाचे नाव शपरूद्दिन शेख (वय ४५) असून आंबेझरी येथिल रहिवासी आहे. पिडीताचे आई- वडील शेतात गेल्याची संधी साधून मतीमंद असलेल्या १९ वर्षीय मुलगी एकटी असल्याची पाहून नराधमाने घरात घुसून त्या मुलींचे हातपाय बांधून तिच्यावर अतिप्रसंग केला आहे.
सदर आरोपीवर भादवी कलम अपराध कं व कलम १५ / २३, कलम ३७६ (१), ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एल), ४५० भादवि सहकलम 3(1)(W)(i)(ii), 3 (2) (va) अनुसुचित जाती जमाती अत्याचार संरक्षण अधिनियम गुन्हाची नोंद केली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे. आरोपीवर तात्काळ सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत असून तीव्र संताप समाजामध्ये व्यक्त केला जात आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *