लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– 1 जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत सेवेत असताना एम.फील. पदवी अहर्ता प्राप्त अध्यापकाचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचे कडून नेट-सेट मधून सूट मिळवण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने सदर अध्यापकांचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचेकडे पाठवावे अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
1 जानेवारी 1994 ते 11 जुलै 2009 या कालावधीत सेवेत असताना ज्या अध्यापकांनी एम.फील.पदवी अहर्ता प्राप्त केली आहे व ज्यांची नियुक्ती विद्यापीठ विहित निवड समितीद्वारे झाली आहे अशा सर्व नियमित अध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाने आणि उच्च व त्यांचे शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी कॅश अंतर्गत पदोन्नतीचे लाभ देण्यास मंजुरी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाद्वारे संचलित असलेल्या महाविद्यालयातील नियमित शिक्षक सेवेत असलेले अध्यापक ज्यांची नियुक्ती विद्यापीठ समितीद्वारे झालेली आहे व ज्यांनी 11 जुलै 2009 पूर्वी एम. फील .पदवी अहर्ता प्राप्त केली आहे अशा सर्व अध्यापकांना यूजीसी कडून नेटसेट परीक्षेतून सूट मिळण्यासाठी अध्यापकांचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पाठविणे आवश्यक असून या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशी आग्रही भूमिका गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेचे अध्यक्ष व विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे व संघटनेचे सचिव तथा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक गोरलावार आणि संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद बोधाने यांनी माननीय कुलगुरू महोदय यांना आपली भूमिका पटवून दिली आहे.यासंदर्भात कुलगुरू महोदयांनी सकारात्मक भूमिका घेऊ असे संघटनेच्या शिष्टमंडळाला आश्वासित केले आहे .यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते