शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्ट आरोग्य सेवा केन्द्रतर्फे आरोग्य शिबिर संपन्न. .. !

 

लोकदर्शन मुंबई मालाड – 👉 महेश्वर तेटांबे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्ट आरोग्य सेवा केन्द्र
रजि. क्र. एफ ७०५९३, मुंबई, महाराष्ट्र राज्य.यांच्या संयुक्त विद्यमाने उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवार, दि. २२ जुलै २०१३ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शिवगड कार्यालय, चंदन ड्रेसवाला समोर, दादीशेठ रोड, मालाड (प) येथे करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिरासाठी राज्यांतून अनेक लाभार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात प्रामुख्याने ५ ते २० वयोगटातील (मुला-मुलींसाठी) तसेच त्यापुढील वयोगटासाठी मोफत डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मा वाटप तसेच ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, रक्तदाब, मोफत C.B.C./ R.B.S. तपासणी शिवाय मोतीबिंदूचे निदान व माफक दरामध्ये ऑपरेशनसाठी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच एक्यूपंक्चर तज्ञ समीर वि बिडये यांच्या कडून मोफत कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात,अस्थमा असणाऱ्या पेशंटची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष चंदन भाई शिंगरे, मुंबई अध्यक्ष सचिन पाताडे, दिग्दर्शक, पत्रकार महेश्वर तेटांबे तसेच ट्रस्टचे सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते. या आरोग्य शिबिरासाठी साहू आय हॉस्पिटल डॉ. बहार शिरोडकर, एक्यूपंक्चर तज्ञ समीर वि.बिडये (DAC), पंचकर्म गणेश गोसावी, डॉ. वी. सी. शर्मा (BAM&S) आणि डॉ.विजय वाघ (MBBS) यांचे विशेष योगदान लाभले.अशा तऱ्हेने खेळीमेळीच्या वातावरणात हे आरोग्य शिबिर पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here