लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 25 जुलै.पनवेल येथील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजी)या शोरूमचे आधीपेक्षा भव्य व दिमाखदार असे नूतनीकरण करण्यात आले आहे. ग्राहकांच्या मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादामुळे ग्राहकांना खरेदीचा आनंद देण्यासाठी, मनाला भुरळ पाडणाऱ्या ग्राहकांच्या आवडीच्या तीन हजारांहुन अधिक मनमोहक डिझाईन या शोरूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी या भव्य व दिमाखदार शोरूमचे उदघाटन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पीएनजीचे मॅनेजिंग डायरेक्टर सौरभ गाडगीळ, सेल्स हेड सुरेश कृष्णन, जनरल मॅनेजर ऍडमिन निलेश कोळपकर, एरिया मॅनेजर मुंबई तुषार सप्रा आदी मान्यवर उपस्थित होते.