मी एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे वृक्षारोपण .

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 25 जुलै सामाजिक कार्यकर्ते देविचंद अनंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे दरवर्षी उरण ते कार्ला (एकविरा देवी मंदिर) असे बाईक रॅली काढली जाते व पर्यावरणाचा संरक्षणाचा संदेश देत दरवर्षी श्री एकविरा आई मंदिर कार्ला येथे डोंगर परिसरात वृक्षारोपण केले जाते. उरण तालुक्यातील श्री एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे यंदाही उरण ते श्री एकविरा मंदिर (कार्ला )अशी युवकांनी बाईक रॅली काढली.कार्लाल्या पोहोचल्यावर एकविरा आईचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत एकविरा देवी मंदिर परीसरात वृक्षारोपण केले. दरवर्षी अशा उपक्रमातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या उपक्रमाक्रतून देण्यात येतो. यावेळी मी एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरणचे एकूण 235 पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here