घोडाझरी तलावातील मृतक युवकांच्या कुटुंबियांना आमदार प्रतिभाताई धानोरकरांची आर्थिक मदत

by : Priyanka Punvatkar

चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या दुःखात कुटुंबीयांसोबत सहभागी असल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.
घोडाझरी तलावात शेगाव येथील मनीष श्रीरामे, धीरज झाडें, चेतन मांदाडे व गिरोला येथील संकेत मोडक या मृतक युवकांची नावे आहेत. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक सहकार्यकरीत सांत्वन केले.

पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी युवक फिरायला जात असतात. परंतु त्यांनी पावसाचा आनंद घेत असतांना अधिक जोखिमेचे पाऊल उचलू नये. असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी राजूभाऊ चिकटे माजी सभापती वरोरा, मिलींद भोयर,तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी वरोरा, निलेश भालेराव योगेश खामनकर, यशवंत लोडे, प्रभाकर घोडमारे, दिवाकर मेश्राम, दिवाकर निखाडे, शंकर घोडमारे, पुरुषोत्तम निखाडे, प्रफुल वाढई ग्रा.प सदस्य शेगाव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here