लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे अॅक्शन मोडवर असून जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत. हॉटेल एन.डी. चंद्रपूर येथे आ. धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांची बैठक पार पडली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, जिल्हय़ातील सर्व तालुक्यात काँग्रेस पक्षाचे भक्कम आणि मजबूत संघटन तयार करण्याचा आपला निर्धार असून काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी आपण थेट संपर्कात राहून जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू. कुठेही, कुणालाही, काहीही अडचण भासल्यास आपण त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. जिल्हात काँग्रेसचे हात सातत्याने मजबूत ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे मतभेद, गटतट विसरून सर्वांनी मिळून परिश्रम घ्या, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष क्रमांक एकवर राखण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या असे उपस्थित सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांना आवाहन केले. जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून भविष्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. या बैठकीत सर्व तालुका अध्यक्षांनी आपल्या कार्याचा आढावा सादर केला. विविध ठिकाणी येणाऱ्या अडचणी सुद्धा उपस्थित केल्या. जिल्हाध्यक्षांनी सर्वांची मते ऐकून घेतली, अडचणी सोडविण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी चंद्रपूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंग गौर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद दत्तात्रय, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदाणी, महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य- ठेमस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचसोबत नागभीड प्रमोद चौधरी, सिंदेवाही चे रमाकांत लोधे, सावली चे नितीन गोहाने, पोंभुरण्याचे रवी मारपल्लीवार, बल्लारपूर चे गोविंद उपरे, शहर अध्यक्ष अब्दुल करीम, राजुरा चे रंजन लांडे, गोंडपीपरी चे तुकाराम झाडे, कोरपनाचे उत्तमराव पेचे, जीवतीचे गणपत आडे, भद्रावती चे प्रशांत काळे, चिमूर यु. काँ चे नागेश चट्टे या सर्व तालुकाध्यक्षांसह मूल बाजार समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, चंद्रपूर सोशल मीडिया चे अध्यक्ष मुन्ना तावाडे, एजाज कुरेशी, नरेंद्र डोंगरे यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.