लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी
पवनी:-मुंबई येथील पारिजात या सामाजिक फाऊंडेशनतर्फे ‘बॅक टु स्कुल’ उपक्रमांतर्गत पवनी येथील अषित प्राथमिक शाळेतील जवळपास १४० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये स्कूल बॅग, पेन्सिल, पेन, रंगपेटी, चित्रकला वही, मोजपट्टी, खोडरबर असे विविध शालेय साहित्याचा समावेश असलेली शैक्षणिक किट महाराष्ट्रातील गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी पारिजात या सामाजिक संस्थेतर्फे महाराष्ट्रातील २६ पेक्षा अधिक जिल्हयात हा उपक्रम राबविला जातो व सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देण्यात येते.यासाठी पारिजात संस्थेचे कार्यकारी सदस्य गुरूदास बाटे, अमित शिवे,हर्षद ठाकरे यांनी यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. शाळेतील उपक्रमशिल राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक अशोक गिरी यांनी पारिजात संस्थेशी संपर्क साधून शालेय साहित्य मोफत प्राप्त केले. शालेय साहित्य वितरण समारंभाला नुतन कुर्झेकर शिक्षण सभापती पंचायत समिती पवनी,सुवर्णा रामटेके पं.स.सदस्या,दिपाली बोरीकर गटसमन्वयक ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रंजितभाऊ शिवरकर,व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुजाता वासनिक,साधनव्यक्ती डॉ.मुरलीधर रेहपाडे,महेंद्र वाहने, शाळेचे मुख्याध्यापक आर.व्ही.बिसने,प्रहार संघटनेचे कार्यकर्ते धनराज सेलोकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. साहित्य वितरणानंतर शालेय परिसरात विविध रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. सुत्रसंचालन अशोक गिरी यांनी केले तर प्रयागराज भोयर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुरलीधर जीवतोडे, प्रणय धुरई,अर्चना रामटेके, धनश्री मुंडले,संगीता बिसने, विजुमाला साखरकर, करुणा वाघमारे तथा शालेय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.