कोरपना च्या वैभव चा डबल धमाका स्वप्न झाले साकार ;

 

लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना – कोरपना येथील प्रभाग क्रमांक एक मधील रहिवाशी असलेल्या वैभव विनायक ढोके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात येणाऱ्या कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक या दोन्ही परीक्षा बुधवारी एकाचं दिवशी उत्तीर्ण केल्या.
वैभव हा अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर आहे. त्याचे वडील स्वर्गीय भाऊराव चटप आश्रम शाळेत कार्यरत आहे. शांत सयमी स्वभाव असलेला वैभव च्या यशाने त्याच्यासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणास्त्रोत निर्माण झाले आहे. वैभव नी स्पर्धा परीक्षेच्या तयारी सोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे. त्याचे वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संजय ठावरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here