चेतन भोईर झाले नवघरचे प्रथम वकील

by : Vitthal Mamatabade

उरण :  तालुक्याचे भाग्यविधते तथा शिक्षण महर्षी वीर तू.ह.वाजेकरशेठ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरण मधील नवघर गावाचे सुपुत्र कु.चेतन मनोहर भोईर यांनी एलएलबी ची परीक्षा चांगल्या गुणांनी पास करून नवघर गावामधून वकील होण्याचा पहिला मान मिळविला असल्याने कु.चेतन भोईर यांच्यावर नवघर ग्रामस्थांसह त्यांचे नातेबाईक.हितचिंतक आणि मित्र परीवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कु.चेतन हे मनमिळाऊ स्वभावाचे असून आपले आजोबा धनजी भोईर आणि वडील मनोहर भोईर यांच्या समाज सेवेच्या कार्याचा वसा त्यानी पुढे चालू ठेवला असून त्यांच्या प्रेरणेमधून त्यांनी स्वतःवकील होण्याचा निर्णय घेतला.कु.चेतन हे चांगले कवी व गीतकार व नृत्यविशारद आहेत त्यांनी लिहिलेल्या गीतांवर आधारित त्यांचे अनेक अलबंब प्रसिद्ध झाले आहेत.तर अनेक काव्य संमेलनात त्यांनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

 

कु.चेतन यांनी आपले प्राथमिक शिक्षण जेएनपीटी विद्यालयातून पूर्ण केले तर उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी वीर वाजेकर महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर त्यांनी भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालय पनवेल येथून वकीलतेचा अभ्यासक्रम पूर्ण करून एलएलबीची पदवी चांगले गुण मिळवून संपादीत केली आहे.त्यांच्या यशा बाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले “रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असतना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वावलंबी शिक्षण ही संकल्पनेचा आदर्श मी डोळ्यापुढे ठेवला आणि पार्टटाइम नोकरी करून मी माझे महाविद्यालयीन व वकिली पर्यंतचे सर्वशिक्षण पूर्ण केले आहे”.आज स्वावलंबी शिक्षण घेऊन नवघर गावामधून वकील होण्याचा पहिला मान कु.चेतन भोईर यांना मिळविला असल्याने यांच्यावर नवघर ग्रामस्थांसह त्यांचे नातेबाईक.हितचिंतक आणि मित्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *