आता बांधकाम विभागाचे नवीन विश्रामगृह सांगणार चंद्रपूरचा इतिहास* *♦️ना.सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

रात्री आकाशात जसा चंद्र दिसतो तसा सर्वांना चंद्रपूर जिल्हा दिसावा दृष्टीने विकासकामे केली जात आहे.आता पर्यंत 205 महत्वाची विकास कामे पूर्णत्वास गेली.दुर्दैवाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह राहून गेले.परंतु लवकरच नवीन विश्रामगृह अस्तित्वात येईल.इथे येताच लोकांना चंद्रपूरचा इतिहास कळेल.इथला परिसर त्याच पार्श्वभूमीवर असेल,अशी घोषणा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.ते गुरुवारी नवीन विश्रामगृहाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
यावेळी आ.सुधाकर अडबाले,भाजपा नेते देवराव भोंगळे,डॉ.मंगेश गुलवाडे,सुभाष कासंगोट्टूवार,रवी गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,राहुल पावडे,विशाल निंबाळकर,सूरज पेदूलवार,प्रज्वलन्त कडू,अधीक्षक अभियंता हेमंत पाटील,अरुण गाडेगोने,कार्यकारी अभियंता अरुण येरगुडे व टांगले यांची उपस्थिती होती.
ना.मुनगंटीवार म्हणाले,सत्ता नसल्याने अडीच वर्षे विकास कामांना ब्रेक लागला होता.परंतु आता झपाटयाने कामे होत आहे.चंद्रपूरचा बसस्टँड लवकरच पूर्ण होणार आहे.चंद्रपूर व मूलच्या बसस्थानकावर प्रवाश्यांना ताडोबात असल्याचा अनुभव यावा अशी व्यवस्था आपण करतो आहे.या प्रसंगी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या व होणाऱ्या विकास कामांची यादी प्रस्तुत केली.चंद्रपूरात होणारे गोंडवाना विद्यापीठ उपकेंद्र,अजयपूर येथे होणारे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रशिक्षण केंद्र,आय.टी.आय चे अपग्रेडेशन,जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण आदींचा यात समावेश होता.

*रोजगार देणारे हात व्हावे म्हणून नियोजन*

पारंपरिक शेती करीत असताना बऱ्याच अडचणी आहेत.याला तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून टाटा ट्रस्टच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रकल्प पूर्णत्वास येईल.खनिज विकास निधीचा वापर शिक्षणासाठी करू,आता रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे हात व्हावे म्हणून स्व.सुषमा स्वराज यांच्या नावे कौशल्य विकास प्रकल्प अस्तित्वात येत आहे,अशी माहिती ना.मुनगंटीवार यांनी दिली.

*आ.सुधाकर अडबालेंचे केले कौतुक*

ना.मुनगंटीवार यांना मुबंई गाठायचे असल्याने आयोजकांनी आ.सुधाकर अडबाले यांचे भाषण टाळले.याची दखल घेत ना.मुनगंटीवार यांनी आ.अडबाले यांचे कौतुक केले.ते म्हणाले आ.अडबाले पक्षभेद न पाळता,विकास कामांसाठी तत्पर असतात,कार्यक्रमात सहभागी होतात ही बाब कौतुकास्पद आहे.लोकप्रतिनिधींची अशीच भूमिका असायला हवी.पुढील कार्यक्रमात त्यानां बोलायची संधी नक्की मिळेल,असे त्यांनी आश्वास्थ केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here