पोलीस क्वार्टर येथील घनकचरा व्यवस्थापन करण्याची युवासेना युतीची निवेदन देऊन मागणी करताच त्वरित कामाची आमलबजावणी

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर 6जुलै बरेच दिवसापासून गिरनार चौक येथील पोलीस क्वार्टर परिसरात कचऱ्याचे व्यवस्थापन बरोबर होत नसल्याने तेथील नागरिक व ये-जा करणारे लोक त्रस्त झाले होते ,शिवाय ती जागा कचरा टाकण्याची सुद्धा नव्हती व तो कचरा उचलला जात नसल्यामुळे तेथे परत आजूबाजूचे लोक ,जवळपासचे दुकान, हॉटेल्स वाले आणि घंटागाडी सुद्धा तिथेच कचरा टाकून जात होते .पोलीस क्वार्टर येथील किचनच्या खिडकी व कचऱ्याची जागा लागूनच होती येथील लोकांना दुर्गंध व डासांचा त्रास होत होता .ही बाब माहिती होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख माननीय संदीप भाऊ गिर्हे, युवासेना जिल्हाधिकारी विक्रांत भाऊ सहारे यांच्या मार्गदर्शनात, युवा सेना युवती जिल्हाअधिकारी सौ रोहिणी विक्रांत पाटील यांनी लगेच युवती सेना व तेथील नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिका येथील स्वच्छता अधिकारी साहेबांना निवेदन दिले व त्यांनी लगेच एका तासातच तेथील कचऱ्याचे व्यवस्थापन केले समोर पण तिथे कोणी कचरा टाकणार नाही त्यासाठी कार्यवाही लवकर करू असे सांगितले. यावेळी युवासेना युवती उपजिल्हा अधिकारी धनश्री प्रभा हेडाऊ, उपजिल्हा समन्वयक संतुष्टी प्रवेश बुटले, शहर युती अधिकारी हिमानी मेश्राम,तालुका युवती अधिकारी प्रज्ञा ठमके शाखा युती अधिकारी भाग्यश्री खनके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here