अनुभूती बाल वाचक कट्टा,कल्याण आयोजित मराठी बाल वाचन स्पर्धा उत्साहात संपन्न. .. !

 

लोकदर्शन कल्याण👉-गुरुनाथ तिरपणकर

‘वाचाल तर वाचाल’ असं आपण नुसतं निबंधापुरतं म्हणतो पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तक आणि तेही मराठी पुस्तक वाचन कुठे तरी दूर राहीलंय. हीच नेमकी बाब हेरून कल्याण मध्ये प्रथमच अनुभूती बाल वाचक कट्टा, कल्याण आयोजित मराठी बाल वाचन स्पर्धा पार पडली.

२ जुलै २०२३, रविवार सकाळी १० वाजता गजानन विद्यामंदिर कल्याण पश्चिम येथे मराठी पुस्तक वाचन आणि मराठी कविता वाचन अशा दोन गटात ही स्पर्धा उत्साहात भरघोस प्रतिसादात पार पडली.

स्पर्धक नोंदणी सुरु झाल्यावर काहीच दिवसात ती पूर्ण होऊन आम्हाला नोंदणी बंद करावी लागली. कल्याण, डोंबिवली व टिटवाळातील वेगवेगळ्या शाळेतील ८० स्पर्धक त्यात सहभागी झाले त्यांच्या कडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता मा. मुख्याध्यापिका कांचन भालेराव, गजानन विद्यामंदिर या प्रमुख पाहुण्या तर परीक्षक मा.श्री प्रवीणजी देशमुख व मा. श्री अभिजित जी झुंझारराव यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने या स्पर्धेला सुरवात झाली.

या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक पालकांनी मराठी पुस्तक वाचन संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या. कविता वाचन स्पर्धेचे परिक्षक मा. श्री प्रवीणजी देशमुख आणि पुस्तक वाचन स्पर्धेचे परिक्षक मा.अभिजित जी झुंझारराव लाभले दोघांनी परिक्षणाची जवाबदारी उत्स्फूर्तपणे पार पाडली. साधारण चार तास चाललेल्या या स्पर्धेत पुस्तक वाचक गटामध्ये वांशिका घोंगरे – प्रथम, आर्या हिवाळे द्वितीय तर समृद्धी शेट्टी हिने तृतीय क्रमांक पुरस्कार पटकावला. सुयश टेंभे व निमिषा मोराणकर यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला. तसेच कविता वाचन या स्पर्धेत आर्या शिंपी – प्रथम, स्पृहा मोराणकर – द्वितीय तर श्रेया जोशी – तृतीय आणि जुईली मलबारी व आरोही शेंबडे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.

ह्या नीट नेटक्या आयोजनात प्रसाद सोमण, मृणालिनी जोशी आणि प्रणिता चितापूरकर यांनी घेतलेल्या परिश्रमा मुळेच ही स्पर्धा यशस्वी पार पडली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. बाल वाचक कट्टा असे नवनवे उपक्रम राबवणार आहे. अशा स्पर्धा , उपक्रमाव्दारे मुलांची वाचानाशी नाळ जोडली जावी, वाचन संस्कार रुजावा, वाचनाची गोडी निर्माण व्हावी अशी इच्छा अशी ईच्छा अनुभूतीच्या सौ. शुभांगी ओतूरकर यांनी व्यक्त केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *