अतिक्रमण हटाव सत्याग्रह समीक्षा बैठकीत दोनद( नांदगाव पेठ)पूर्णवसनाकरिता एल्गार ♦️रिपब्लिकन आघाडीचे ऍड पी एस खडसे यांच्या नेतृत्वात 14 जुलै ला नांदगाव पेठ येथे सत्याग्रह मोर्चा…

लोकदर्शन अमरावती 👉
मोहित राऊत

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ तालुक्यात असणारे दोनद हे गाव पेढी बॅरेज प्रकल्प धरणग्रस्त झाले होते. तेव्हा दि 5 जुलै 2023 रोजी गावातील बौद्ध समाज सभागृहात सर्व जातधर्माच्या लोकांची बैठक पार पडली.तेव्हा त्यामध्ये त्या गावातील 130 ते 140 कुटुंबीयांचे पुनर्वसन हे नांदगाव तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी सरकारी जागेवर करण्यात आले होते. तेव्हा विविध संघटनांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 20 जून 2022 रोजी अध्यादेश काढून नांदगाव पेठ येथील ई-क्लास जागेवर भूषण पुनर्वसनाची जागा निर्धारित करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी अद्यापही पुनर्वसन प्रकल्पग्रस्त नागरिकांची न झाल्याने दोनो या गावातील नागरिक नदीचे पाणी गावात घरात शिरून घरांची झोपड्यांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान व जीवित हानी पासून त्रस्त झाले आहेत. कशामध्ये शासन प्रशासन हे आपापल्या जबाबदारीपासून पळवाट काढत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी ज्येष्ठ विधीज्ञ एडवोकेट पी एस खडसे यांच्या नेतृत्वात गेल्या कित्येक वर्षापासून हा पुनर्वसनाचा लढा चालू ठेवला आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश झुंजारून एक तहसीलदार हे पुनर्वसनाच्या जागेवरील अतिक्रमण अद्यापही पटवायला तयार नाहीत. त्याचे कारण स्थानिक राजकीय पक्ष किंवा पुढारी नेते त्यांचे असल्याचे सूत्रांची माहिती आहे. त्यामूळे लोकशाही मार्गाने दि14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऍड पी एस खडसे यांच्या नेतृत्वात हा सत्याग्रह मोर्चा नांदगाव पेठ तहसील येथून काढून अतिक्रमण जगेपर्यंत काढल्या जाणार आहे.अशी माहिती सदर समीक्षा बैठकीत याबाबत सर्व गावातील नागरिक यांना देण्यात आली .आणि सत्याग्रह यशस्वी करण्यास सर्वांना आपल्या परीने नियोजन करून सत्याग्रह मोर्चा तयारी करिता पवित्रा घेण्यास निर्देश त्याठिकाणी देण्यात आलेत.त्यावेळी रिपब्लिकन आघाडीचे ऍड पी एस खडसे,भारतीय पँथर नेते सिरसाठ,ज्येष्ठ प्राचार्य मंडळी, ऍड राजू म. कलाने, ऍड गौतम पी. खोब्रागडे पत्रकार मोहित राऊत तथा समस्त दोनद गावातील महिला व पुरुष, मुल मुली त्यावेळी बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here