भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने तुळशी रोपे वाटप

 

लोकदर्शन👉 डोंबिवली-गुरुनाथ तिरपणकर

विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधून भाजपा चित्रपट कामगार आघाडी,डोंबिवलीच्या वतीने भाजपच्या माजी नगरसेविका व डोंबिवली भाजपा चित्रपट कामगार आघाडी शहर अध्यक्षा शर्मिला केसरकर यांच्या हस्ते फडके रोडवरील गणेश मंदिर येथे तुळशीची रोपे वाटप करण्यात आले.यावेळी संघटनेच्यावतीने पत्रही देण्यात आले.हा कार्यक्रम डोंबिवली शहर भाजपा चित्रपट कामगार आघाडी व गणेश मंदिर संस्थान यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here