लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ आमदार निधी अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील कामगार नगर येथे सास्ती रोड ते सुरेंद्र मोहीतकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड – ८ लक्ष, विजय कानकाटे ते गजबे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे – ८ लक्ष, कुत्तरमारे ते रोगे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये अशा एकूण ३१ लक्षाच्या विकासकामांचे भुमीपुजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आ. धोटे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि विविध समस्या जाणून घेतल्या. रामपूरवाशीय नागरिक व रामपूर काँग्रेसच्या वतीने आ. धोटे यांना रामपूर राजुरा नगर परिषदेला जोडण्यात यावे, रामपूर साठी स्वतंत्र विद्युत फिडर द्यावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आ. धोटे यांनी रामपूर राजुरा न. प. ला जोडण्यासाठी व स्वतंत्र फिडरसाठी निश्चितपणे प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी माजी नगरध्यक्ष अरूण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रजन लांडे, सरपंच नंदकिशोर वाढई, आर. कामगार नेते अनंता एकडे, आर. यादव, कृ. उ. बा. समितीचे संचालक जगदीश बुटले, संरपच वंदना गौरकर, उपसरपंच संगिता उरकुडे, उपसरपंच राजकुमार पाटील, ग्रा.प. सदस्य रमेश झाडे, लक्ष्मी चौधरी, संगीता विधाते, लता डखरे, अनिता आडे, अजय साकिनाला, श्रीधर रावला, आकाश दासर, दिपक झाडे, माजी सरपंच रतन गर्गेलवार, मजुषा खंडाळे, प्रभाकर बघेल, अशोक मुन, विजय कानकाटे, रंगराव कुडसंगे, कोमल फुसाटे, हारून शेख, गजानन कुबळे, उईके सर, उईके मॅडम, कानकाटे मॅडम, पंढरी मोहितकर, रवी लोहे, एकनाथ खडसे, नरसिंग भुपल्ली, संदिप नन्नवरे, अतुल खनके, विराज गजबे, हिगांणे, बुरांडे सर, सतीश चौधरी, मोहीतकर ताई, बावणे ताई यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.