सामाजिक बांधिलकी जपत बौध्द विहाराचे लादी व रंगरंगोटीचे काम पूर्ण.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 4.जुलै आषाढ पौर्णिमा व वर्षावास निमित्ताने उरण बौध्दवाडी येथे सामाजिक बांधिलकी जपत बुद्ध विहाराला संपूर्ण स्टाईल लादी प्रसिद्ध उद्योजक तेजाब म्हस्के यांनी लावली. व बुध्द विहार मध्ये प्रकाश धर्मा कांबळे यांनी पत्नी बौध्दवासी पुष्पा प्रकाश कांबळे यांच्या स्मरणार्थ गौतम बुद्धांची स्पाटेक लादी भेट दिली. व रोहित रविंद्र कांबळे यांनी बुध्दविहाराला ऑईल पेंट कलर लावुन दिला आहे. या उद्घाटन प्रसंगी उद्योजक रूषिकेश तेजाब म्हस्के व उरण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीष निकम उपस्थित होते. बौध्दजन पंचायत समिती शाखा नंबर 843 उरण बौध्दवाडी व माता रमाई महिला मंडळचे सर्व सभासद तसेच अध्यक्ष प्रकाश कांबळे,सचिव विजय पवार, विनोद कांबळे, हर्षद कांबळे, अखिलेश जाधव,जितेंद्र भोरे,संतोष कांबळे,विशाल कवडे, हरिश्चंद्र गायकवाड,धनेश कासारे,अजय कवडे,माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष सुनिता सपकाळे, करुणा भिंगावडे, स्वप्नाली कवडे संगिता जाधव, गीता कांबळे,रुजा कवडे,चंद्रभागा जाधव सर्व उपासक व उपासिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here