लोकदर्शन 👉 प्रतिनिधी
पंढरपूर : दिनांक २९ जून आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा जमा झालेला आहे. पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि कुटुंबीयांसह विठोबाची महापूजा केली. नगर जिल्ह्यातील बाऊसाहेब काळे आणि मंडल काळे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह पूजेचा मान मिळाला. यावेळी पांडुरंगाच्या चरणी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुखात ठेव, अशी विनवणी केली. राज्यात उशिरानं सुरु झालेला पाऊस चांगला बरसू दे, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी विठुरायाच्या चरणी केली. विठुरायाकडे राज्याचं भलं होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठोबाकडं घातलं. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असं साकडं घातल्याचं त्यांनी सांगितलं. सलग दुसऱ्यांदा महापूजेचा मान मिळाला हे आपलं भाग्य समजतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचा नातू हेही या महापूजेला उपस्थित होते. एकीकडे भाविकांचं दर्शन सुरु असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा सुरु होती. आलेले मंत्रीही मंदिरात जमिनीवर बसलेले होते.
पंढरपूरचा कायापालट करणार
पांडुरंगाची पूजा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना, पंढरपूरचा कायापालट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. पंढरपूरचा विकास आराखडा सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असं आश्वासनही त्यांनी पंढरपूरवासियांना दिलं.
वारंवार वारीची संधी मिळू दे, काळे दाम्पत्याची विनवणी
नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे गेल्या २५ वर्षांपासून वारी करीत आहेत. देवगड ते पंढरपूर ऊास्करगिरी महाराज यांच्यास�