राज्यात यंदा मुबलक पाऊस, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा दावा.

 

लोकदर्शन.👉 मोहन भारती

राज्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती नसून मुबलक पाऊस होणार आहे, असा दावा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केला आहे. 7 इंच जमिनीत ओल तयार झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

राज्यात आजपासून मान्सूनचे आगमन झाले, मात्र पश्चिमेकडून येणारा पाऊस काही भागांमध्ये स्थिरावला असून पूर्वेकडून येणाऱ्या पावसाची प्रतीक्षा लोकांना आता करावी लागत आहे. त्यामुळे यंदा पूर्वेकडून येणारा पाऊस राज्यात स्थिरावणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here