लोकदर्शन कोरपना.ता. प्र. 👉 अशोक डोईफोडे .
कोरपना आदिवासी तालुका असून या भागातिल् आनलाईन प्रक्रिया नेहमी खंडित असल्याचा प्रकार नेहमीचाच आहे .गेल्या अनेक दिवसापासून कधी विद्युत पुरावठा खंडित तर कधी नेटची समस्या तर कधी कृत्रिम समस्या या सर्व समस्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आता शैक्षणिक सत्र सरू झाले असून शाळा म्हविद्याल्यामध्ये प्रवेश सुरु असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातीचा दाखल उत्पन्न प्रमाणपत्र,नांक्रिमिनील ,अधिवास,शपत पत्र या प्रमापत्राची प्रवेशासाठी आवश्यता आहे मात्र वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्याची कागद पत्राासाठी तालांबळ उडत आहेत गेल्या पंढरा दिवसापासून तहसील कार्याल्यात चकरा मारत आहे शेतीचा हंगाम सुरु असल्यामुळे विद्यार्थ्याबरोबर पालकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागत सेतू च्या दारावर सर्वर डाऊन असल्यामुळे कामकाज बंद असल्याचे फलक लावण्यात आले आहे.त्यामुळे विद्यार्थी पालकवर्ग नागरिक कागदपत्रासाठी अडचणीत निर्माण झाल्या आहे जनतेचा वेळ पैसा वाया जाऊन दररोज कार्याल्यात आल्या पावली वापस जावे लागत आहे .या गंभीर बाबी बाबत माहिती घेण्यास तोडगा काढण्यास सितारामजी कोडापे माजी जी.प.सदस्य यांनी तहसील कार्यालयात गेले असताना तहसिलदार व नायब तहसीलदार् यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या .तसेच सेतू बाबच्या आनलाईन व सर्वर डाऊन समस्या वर लवकर तोडगा काढण्याची मागणी माजी जी.प.सदस्य सीतारामजी कोडापे व नागरिकांनी केली आहे.