लोकदर्शन👉 प्रतिनिधि
आदरणीय सी ओ साहेब आपण नुकतेच गडचांदूर नगर परिषदेचा नवीनच कारभार सांभाळत आहात यामुळे ही बाब आपल्या लक्षात आणून देणे अत्यंत आवश्यक आहे.
मागील पाच वर्षापासून प्रभाग क्रमांक 7 मधील सुमनबाई आत्राम (माजी सरपंच) यांच्या घरापुढील घाणीच्या साम्राज्याचा प्रश्न सुटता सुटत नाही आहे, तरी कृपया आपण जातीने लक्ष देऊन जनहितात योग्य ते पाऊल उचलावे.
सविस्तर वृत्तांत याप्रमाणे मागील सिओ तथा विद्यमान नगराध्यक्षा, नगरपरिषद स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग तथा स्थानिक वार्ड मेंबरला ही संपूर्ण बाब माहित आहे.
या एरिया मध्ये नालीचे सांडपाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये घाण तर होतच असते पण बाराही महिने पाणी साचत असून याचे वेळोवेळी पत्र नगर परिषद स्वच्छता विभाग तथा नगराध्यक्ष वार्ड मेंबरला दिले असून सुद्धा हेकेखोरीपणामुळे थातूर मातुर मुरूम टाकण्याचे नाटक करण्यात आले .
आमच्या वार्डातील जनतेला घाणीतच राहावं लागत आहे. या ठिकाणी डासांची निर्मिती, अळ्यांची निर्मिती झाली असून दुर्गंधी वाढली आहे व आरोग्यास धोका आहे. येण्या जाण्यासाठी योग्य रस्ता पण नाही तरी कृपया आपण स्वतः जातीने लक्ष देऊन जनतेच्या हितार्थ लवकरात लवकर या घाणीच्या विळख्यातून काढून नालीचे बांधकाम पूर्ण करून द्याल हीच अपेक्षा, अन्यथा ज्या पद्धतीने बाजार वाडीतील अस्वच्छतेत मेलेल्या कोंबड्या नगरपरिषद मध्ये आणून टाकाव्या लागल्या त्याच पद्धतीने आम्हाला या गटारातील घाण पाणी नगरपरिषद मध्ये आणून टाकण्याची पाळी येऊ देऊ नये.
पावसाळ्याच्या सुरुवाती अगोदर लवकरात लवकर हा निर्णय मार्गी लावावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे गटारातील पाणी नगरपरिषद मध्ये टाकल्या जाईल