लोकदर्शन अमरावती👉( मोहित राऊत)
ऑल इंडिया लॉ स्टूडेंट युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने
दि 26 मे 2023 यांनी व्ही एम व्ही महाविद्यालय प्रकरणातील कॉपी बहाद्दर आरोपी विद्यार्थी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा प्रथम चौकशी मध्ये प्रणित सोनी नामक विद्यार्थी व भाजपा पदाधिकारी गैरहजर राहिल्याने कार्यवाही पूर्ण करू शकले नाहीत. तेव्हा त्याचाच फायदा आज आरोपी विद्यार्थी घेतांना दिसत आहेत. म्हणजेच की ते विधी महाविद्यालय अमरावती येथे जाऊन खुलेआम आपल्या विद्यापीठाची टिंगल उडवीत आहे असे माहितीच्या आधारे कळल्याने त्यांच्या मते ते चौकशीला हजर राहणार नाहीत. तसेच त्यामुळे आपल्या विद्यापीठाचा अवमान होत आहे. तेव्हा आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या मोनाली तोटे पाटील मॅडम यांनी माहिती दिली की, सादर चौकशी ही न्यायालय याप्रमाणेच आहे. तेव्हा आम्हला सुद्धा न्यायालयीन कामकाज कशाप्रकारे चालते याची माहिती आहेच. तेव्हा न्यायालयाच्या अवमान करण्याची जर का कुणी हिम्मत केल्यास त्यास तत्काळ अटक आणि दंड देण्याचे अधिकार असतात. म्हणून आपणही त्याच प्रकारे आपल्या अवमान केल्याने विद्यार्थी यांना अटक करून पोलिस यांचे मार्फत चौकशी करिता हजर करून आपली जबाबदारी पूर्ण करावी.
कारण दि. 8 जून 2023 रोजी, या प्रकरणातील आरोपी सौरभ पिंपळकर याने हे सिद्ध करून दिले की त्यांच्या पक्षांतर्गत ज्या प्रकारे कायद्याची पायमल्ली करून ध्येय साध्य करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असून आणि पूर्ण देशाच्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चक्क या आरोपी सौरभ पिंपळकर विद्यार्थी याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सदर व्यक्ती हा समाजाकरिता तसेच त्याच्या विरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यक्तीस हानिकारक आहे. तेव्हा आपण सदर प्रकरणातील तिन्ही विद्यार्थी यांच्यावर तात्काळ पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडे माहिती देऊन अटक करण्याची शिफारस करावी आणि आपली चौकशी पूर्ण करावी. कारण आम्हाला निदर्शनास येत असल्याप्रमाणे त्यांच्या पक्षाचे उच्च शिक्षण मंत्री आपल्या विद्यापीठात काही दिवसापूर्वी आल्याने आम्हला शंका आहे की, त्यांनी आपणास सदर प्रकणावर पडदा टाकण्यास राजकीय दबावतंत्र चा वापर करून आरोपी विद्यार्थी यांच्यावरील कार्यवाही स्थगिती आदेश देण्यात आले असल्याची तीव्र शंका व्यक्त करीत आहोत. त्यामुळं सदर चौकशी आपण विधी विद्यार्थी यांच्या भविष्याच्या दृष्टीने निष्पक्षपाती करावी.
ज्यामुळे आम्हा सर्व विधी विद्यार्थी यांना न्याय मिळेल .अशी आशा व्यक्त करतो. मात्र जर का आपण कुठल्याही प्रकारे आरोपी विद्यार्थी यांना कुठलीही सुट किंवा प्रोत्साहन द्याल किंवा कार्यवाही करण्यास कसूर केल्यास आम्ही आपल्या विरुद्ध अमरावती विद्यापीठातील पाचही जिल्ह्यातील विधी विद्यार्थी यांच्या मार्फत परत आपले वरिष्ठ यांचे कडे तक्रार करून आपल्या निलंबनाची मागणी नाईलाजाने करावी लागेल. अशी ताकीद अमरावती विद्यापीठास ऑल इंडिया लॉ स्टूडेंट युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या निवेदनातून देण्यात आली. आणि निवेदनाची प्रतिलिपी ही राष्ट्रपती,भारत सरकार,विरोधी पक्ष, नेते लोकसभा व राज्यसभा भारत सरकार, महामहीम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, विरोधी पक्ष नेते विधानसभा व विधानपरषद, महाराष्ट्र राज्य,विद्यापीठ अनुदान आयोग ( UGC ) यांना देण्याची माहिती देण्यात आली.तेव्हा त्यावेळी प्रामुख्याने राजू मधुकरराव कलाने,अध्यक्ष गौतम पि.खोब्रागडे,सचिव,तमिज खान सर,सक्रिय कार्यकर्ता,अंकूश वानखेडे,तथा मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते.