लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :- अंबुजा सिमेंट फाऊंडेशन पुरस्कृत कौशल्य तथा उद्योजकता विकास संस्था अंबुजा फाटा, ट्रांसपोर्ट नगर, उप्परवाही च्या वतीने आयोजित इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड परिश्रम घेऊन, जिद्द आणि चिकाटीने शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी धडपड करावी. तसेच विद्यार्थ्यांनी अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या कौशल्य विकास कार्यक्राअंतर्गत अल्प कालावधीत रोजगारक्षम किमान कौशलयावर आधारित शिक्षण घेतले पाहिजे व अंबुजा सिमेंट फाऊंडेशननेही परिसरातील प्रत्येक गावात अभ्यासिका निर्माण करून स्थानिक युवकांना सक्षम होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे सांगितले.
या प्रसंगी राजुरा तालुक्यातील भेंडवी, हरदोना खु., हरदोना बु. हिरापूर, इसापूर, कुकुळसाथ, मंगी बु, लखमापूर, पिंपळगांव, थुट्रा, उप्परवाही, व सोनापुर, या गावांतील इयत्ता १२ वीतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या प्रसंगी अंबुजा सिमेंट चे युनिट हेड के. सुब्बुलक्ष्मण, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, श्रीकांत कुंभारे, प्रमोद खडसे, प्राचार्य, शिक्षण वृंद, विद्यार्थी व पालक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.