लोकदर्शन 👉राहुल खरात
आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत धामच्या
इमारतीची देखभाल दुरुस्ती, साफसफाई, व सदर वास्तूचा
सामाजिक कार्यासाठी वापर होणे बाबत…..
मनोज भोसले गटविकास अधिकारी सो (वर्ग १) पंचायत समिती आटपाडी यांना निवेदन
आटपाडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन हे
दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. सदर बचत भवनास विश्वरत्न भारतरत्न , डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. परंतु सदर वास्तूची हेळसांड करण्यात
आलेली आहे. सदर वास्तुस रंगरंगोटी नाही. काचा फुटलेल्या आहेत. आतील लाईट
नादुरुस्त आहेत. सदर वास्तूत व परीसरात घाणीचे साम्राज्य आहे. साफसफाई
केली जात नाही. तेव्हा सदर वचन धामची सत्वर दुरुस्ती, साफसफाई व रंगरंगोटी
करण्यात यावी अशी विनंती समस्त मागासवर्गीय समाज्याच्या वतीने करण्यात येत आहे
तसेच सदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत धामच्या इमारतीची देखभाल
दुरस्ती करून सदर वास्तूची इमारत ही लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, बैठका
या बाबीसाठी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात यावी. सदर बचत
धामची इमारत दुर्लक्षित न ठेवता सत्वर साफसफाई व इतर बाबी करणेत याव्यात.
अन्यथा आटपाडी तालुक्यातील तमाम मागासवर्गीय बांधव आपल्या कार्यालया
समोर जन आंदोलन उभे करतील याची दक्षता घ्यावी
निवेदनाची प्रत पाठविली आहे,
मा.ना.श्री.सुरेश भाऊ खाडे सो, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री
सांगली जिल्हा.
मा.खा.संजय (काका) पाटील साहेब . सांगली .
मा. आ. अनिल (भाऊ) बाबर साहेब खानापूर (विटा)
मा.आ.गोपीचंद पडळकर सो, झरे ता. आटपाडी
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सो. जि.प.सांगली.
मा. तहसिलदार सो, आटपाडी.
मा. शाखा अभियंता सो, बांधकाम विभाग पं.स. आटपाडी.
मा. पोलीस निरीक्षक सो, आटपाडी.
या प्रसंगी
विलास खरात
आप्पा खरात
मोहन खरात
मोटे
बाबूराव
प्रभाकर खरात
गजेंद्र चव्हाण
राजेंद्र सावंत
विकास खरात
रवि लांडगे
शहाजी भिसे (बापू)
दादा कदम
सोमेश खरात उपस्थित होते