लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर-स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची 140वी जयंती भाजपा पदाधिकारी व सावरकर प्रेमिंच्या भरगच्च उपस्थितीमधे साजरी करण्यात आली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या जयंती उत्सवात उपस्थितांनी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
स्थानिक जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर चैकामध्ये दि. 28 मे 2023 रोजी पार पडलेल्या या अभिवादन कार्यक्रमास सर्वश्री खुशाल बोंडे, रत्नाकर जैन, सौ. रंजनाताई वेलंकीवार , रघुवीर अहीर, गिरिष अणे, राजु घरोटे, रवी येनारकर, राजु वेलंकीवार, गुरुदास मंगर, सुरेश जुमडे, आलोक दिक्षीत, मोहन चौधरी, विनोद शेरकी, पुनम तिवारी, हेमंत डहाके, संजय जोशी, यांचेसह अन्य प्रमुख मान्यवर, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर मंचाच्या सौ. रंजनाताई वेलंकीवार म्हणाल्या की, ब्रिटीश सत्तेच्या अंमलाखाली असलेल्या मायभूमिला मुक्त करण्यासाठी सावरकरांनी केलेले कार्य, त्यांनी उपसलेले कष्ट, काळ्यापाण्याची शिक्षा भोगतांना सोसलेल्या प्रचंड यातना उभ्या देशाला ठाऊक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून बहूसंख्य क्रांतिवीर निपजले, त्यांचे या देशावर अनंत उपकार आहेत.
रत्नाकर जैन जयंती उत्सवानिमित्त म्हणाले सावरकरांनी अमाप साहित्य निर्मितीतून मराठी भाषेला अनेक पर्यायी शब्दशिल्प देऊन मराठी भाषा समृध्द व अलंकृत केली. खुशाल बोंडे यांनी सावरकरांसारख्या धगधगत्या अग्निकुंडावर बेछूट आरोप करीत त्यांचा विकृत मानसिकतेच्या लोकांकडुन अपमान केला जात आहे. परंतू अशा मानभंगाने स्वातंत्र्यवीरांची प्रतिमा अधिकच तेजोमय होणार आहे.
याप्रसंगी रघुवीर अहीर म्हणाले की, स्वा. सावरकर यांचे कार्य, विचार हे नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणा देत राहतील. आज देशाला सावरकरांच्या राष्ट्रभक्तीने प्रेरीत व विज्ञानवादी विचारांची गरज आहे.
या आदरांजली अभिवादन सोहळ्यास सर्वश्री प्रमोद शास्त्रकार, रवी जोगी, विठ्ठलराव डुकरे, रवी लोणकर, सचिन कोतपल्लीवार, चांद सय्यद, दिनकर सोमलकर, बी.बी. सिंह राजेंद्र तिवारी, संजय खनके, गौतम यादव, चंद्रकला सोयाम, माया उईके, वंदना संतोषवार, अॅड. सारीका संदुरकर, प्रदिप किरमे, महेश कोलावार, चंद्रप्रकाश गौरकार, अॅड. सुरेश तालेवार, सोपान वायकर, धनराज कोवे, बंशिधर तिवारी,बाळू कोलनकर, राहुल सुर्यवंशी, विजय सराफ, नुतन मेश्राम, विशाल गिरी, नरेद्र लभाने यांचेसह सावरकर प्रेमी नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.