लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – परिसरातील शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून उत्पादनात वाढ व्हावी यासाठी खरीप हंगामापूर्वी गटप्रमुख शेतकरी कार्यशाळेचे आयोजन जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे नुकतेच पार पडले.
अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही उत्तम कापूस प्रकल्प अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकेशन इन्चार्ज विशाल भोगावार उपस्थित होते. उद्घाटन जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांच्या हस्ते पार पडले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोरपना मंडळ कृषी अधिकारी मिलिंदकुमार ढोणे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील राहुलजी आसुटकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष स्वप्निल झुरमुरे, कृषी सहाय्यक कुळमेथे, जेंडर कॉर्डिनेटर, रघुनाथ बाबिलवार, सिमरन किलनाके, पियू मॅनेजर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक मिलिंदकुमार ढोणे यांनी कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची व खरीप हंगाम पूर्वी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. आशिष देरकर यांनी उद्घाटकीय भाषणातून अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाहीच्या वतीने गावागावात राबविण्यात येत असलेल्या कृषी मार्गदर्शनातून शेतकरी जनजागृतीचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणातून लोकेशन इन्चार्ज विशाल भोगावार यांनी माती परीक्षण, जमीन मशागत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, वाणाची निवड प्रक्रिया, लागवडीचे अंतर, आंतरपीक, खत व्यवस्थापन, इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अशिक्षित असूनही जवळपास ५० जणांना रोजगार उपलब्ध करून दिलेल्या जिजाबाई निकोडे या महिलेचा अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला.
कोरपना तालुक्यातील अनेक गावातील गटप्रमुख शेतकरी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रक्षेत्र अधिकारी
सचिन आसुटकर, अरविंद बावणे अनिल पेंदोर, मीनाक्षी मंडल, दतात्रेय उपरे, सुजित सिडाम, संदीप मिटकर, अस्मिता बोंडे, किशोर शेंडे ,विशाल खामकर, आशिष रागीट आदींनी सहकार्य केले.