वडगावात काँग्रेसचा एकतर्फी विजय तर कढोली खु. येथे अविरोध ♦️ग्रामपंचायत पोटनिवडणूक

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – ग्रामपंचायत कढोली खु. व ग्रामपंचायत वडगावची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. वडगावात काँग्रेसच्या संचिता बबन मडावी यांनी शेतकरी संघटना, भाजपा व गोंडवाना युतीच्या कल्पना पद्माकर मडावी यांचा ६७ मताधिक्याने पराभव केला. निवडणुकीत कढोली खु. येथे शेतकरी संघटनेच्या लीलाबाई पांडुरंग कोटनाके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या रंजना उमाजी आत्राम अविरोध निवडून आल्या.
वडगाव येथे काँग्रेसच्या बयनाबाई भिमराव चायकाटी या दोन वार्डातून निवडून आल्याने त्यांनी एका वार्डातील सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली. तर कढोली खु. येथे शेतकरी संघटनेच्या उमेदवार लिलाबाई पांडुरंग कोटनाके अपात्र झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here