७५ फूट ध्वजस्तंभावर फडकला तिरंगा

by : Rajendra Mardane वरोरा नगर परिषदेचा १५७ वा स्थापना दिवस थाटात साजरा

वरोरा : नगर परिषदेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत वरोरा नाका चौक परिसरात ७५ फुट उंच ध्वजस्तंभावर सतत डौलाने फडकत राहणारा राष्ट्रध्वज आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते फडकवून वरोरा नगर परिषदेचा १५७ वा स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त नगर परिषद सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी (भापोसे), संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार निधीतून नगर परिषदेला देण्यात आलेल्या शववाहिका व अंबुलन्सचे आमदारांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. तदनंतर उत्कृष्ट सेवा प्रदान करणाऱ्या न.प. कर्मचाऱ्यांचा तथा जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत पीएम फारमलायजेशन ऑफ मायक्रो फुड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस योजनांतर्गत मंजूर झालेल्या मंजूरी पत्राचे वितरण व बचत गटांना मंजूर झालेल्या कर्ज रक्कमेचा धनादेशाचे वितरण करण्यात आले.
वरोरा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार धानोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. इतर मान्यवरांनी देखील आपल्या मनोगतातून नगर परिषदेच्या १५७ व्या स्थापना दिनानिमित्त गौरवोद्गार काढले.
प्रास्ताविकात मुख्याधिकारी तथा प्रशासक गजानन भोयर यांनी नगर परिषदेच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रकल्प अधिकारी उमेश कथडे यांनी केले तर आभार निलेश सरागे यांनी मानले.
कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, नगर परिषद कर्मचारी वृंदाची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर विभाग प्रमुख गजानन आत्राम व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

#waroranagarparishad

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *