जिवती ग्रामीण रुग्णालयात पद निर्मिती करावी. आमदार सुभाष धोटे यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– चंद्रपूर जिल्हयातील राजुरा विधानसभा मतदार संघातील जिवती तालुका हा डोंगराळ व आदिवासी बहुल तालुका असून जिल्ह्याचे ठिकाणापासुन 100 किमी अंतरावर आहे. तालुक्यातील सर्व सामान्य नागरीकांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालय जिवतीचे श्रेणीवर्धन करून दिनांक 17 जानेवारी 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालय जिवती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार जिवती तालुक्याचे ठिकाणी ग्रामीण रूग्णालय इमारतीचे 90 टक्के बांधकाम पुर्ण झाल्याने पद निर्मिती करणेबाबतचा प्रस्ताव उपसंचालक, आरोग्य सेवा नागपुर मंडळ कार्यालयाकडुन प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, ( आरोग्य – 3) मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयाकडे दिनांक 02/05/2023 रोजी पद निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. करीता चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण रूग्णालय जिवती येथे आकृतीबंधानुसार पद निर्मितीस मंजुरी देण्यात यावी अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here