जागतिक थॅलेसेमिया दिना निमित्त शास्रीनगर शासकीय ॠग्णालय चिदानंद रक्तपेढी मध्ये ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आयोजित रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

 

लोकदर्शन डोंबिवली👉(गुरुनाथ तिरपणकर)-

थॅलेसेमिया मुलांना वेळोवेळी रक्ताची आवश्यकता व गरजू ऋग्णांना नियमित रक्त पुरवठा होत रहावा म्हणुन जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त रक्तदान शिबिरात ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था,जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र आणि श्री.विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवली या सामाजिक संस्थांनी उपस्थित राहून या जीवनदायी कार्यात आपला सहभाग दर्शविला.या शिबिराचे उदघाटन श्री.विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवलीचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते झाले.नियमित रक्तदात्यांसोबत महिला वर्गाचाही या रक्तदान शिबिरात सहभाग दिसून आला.डोंबिवलीतील सुप्रसिद्ध बुवा श्री.सचिन नरहरी यांच्या पत्नी सौ.लक्ष्मी सचिन सावंत यांनी पहिल्यांदा रक्तदान केले.चिदानंद रक्तपेढीच्या सर्व स्टाफचे नेहमी प्रमाणे चांगले सहकार्य लाभले.सर्व रक्तपेढी स्टाफ मेंबर्सना मान्यवरांच्या हस्ते मेडल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या जीवनदायी कार्यात ग्लोबल मालवणी संस्थेचे अध्यक्ष सचिन आचरेकर,डाॅ.गौरी आचरेकर,जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,सौ.श्रुती उरणकर,श्री.विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज डोंबिवलीचे अध्यक्ष बाळकृष्ण पांचाळ,माजी अध्यक्ष अरविंद सुतार सर्व ग्लोबल रक्तदाते परिवारातील रक्तमित्र सागर चव्हाण,स्वरुपानंद चव्हाण,योगेश वालावलकर,विनायक पाटील,किशोर महादेव,रासम,विजय पांचाळ तसेच किरण पुजारी,विनायक पावसकर यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थित सर्व रक्तदाते,सहभागी संस्था,या जीवनदायी कार्यात रक्तदान करुन आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली त्यांचे ग्लोबल रक्तदाते परिवारातर्फे आभार मानण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *