लोकदर्शन पुणे 👉सुनिल ज्ञानदेव भोसले
आज इंदापुर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथील आदिवासी पारधी बेड्यांवर शेवराई सेवाभावी संस्थाच्या वतीने पुणे येथे आयोजित सिसीफुटेज 6 काॅमेराचे ओपनिंग व वृक्षारोपण,माश्याचे , न्हावाचे पुज्य करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापुर पोलीस स्टेशनचे वरीष्ट पोलीस निरीक्षक डी.एस. पवार. बोलत होते
गेले चार वर्षा मध्ये शेवराई सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून राज्यातील आदिवाशी पाड्यावर विवीध ठिकानी 190 कॅमेरे बसवून गरीबांना न्याय मिळवून देण्याचे कांम शेवराई सेवाभावी संस्थाने केले आहे. माझ्या तीस वर्षाच्या नौकरीत पहिल्यांदाच एवढे चांगले काम विचाराच्या आदिवासी पारधी पाडा पहाण्यास मिळाले असे पोलीस निरीक्षक पवार म्हणाले तर
या वेळी आदिवासी पारधी आणी पोलीस यांच्यातील कलंकित दरी कमी घेवुन एक मैत्रीपूर्ण नाते तयार व्हावे या विच्याराने आजचा हा कार्यक्रम शेवराई सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष आणि
आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी आयोजित केला होता, कार्यक्रम विशेष आदर्श तरुणांचा सत्कार करण्यात आला तर काही कुटुबांच्या दारासमोर वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी इंदापुर पोलीस स्टेशन चे वरीष्ट पोलीस निरीक्षक डी.एस .पवार यांच्या हास्ते कार्यक्रम पार पडला या वेळी
सदर कार्यक्रमसाठी विशेष ऊपस्तीत आदिवासी समाजसेवक व साहित्यिक,नामदेव भोसले,पोलीस निरीक्षक डी एस पवार,
संजय भोसले, दिलीप भोसले,सचिन भोसले, प्रदीप पवार, दिपक काळे, सतिश पवार, स्वार्थीक पवार, व कालठण गावचे सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थ, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.