आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते राजुऱ्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन. २.७० कोटी चा पुल, २० लक्षाच्या रस्त्याच्या बांधकामास सुरुवात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांने मंजूर करण्यात आलेल्या राजुरा तालुक्यातील प्रकल्प बाधित गावठाण मौजा बेरडी येथे पुनर्वसन स्थळी मंजूर २ कोटी ७० लक्ष निधीच्या पोचमार्ग पुल बांधकामाचे भूमिपूजन तसेच इंदिरा नगर येथे सामाजिक न्याय विभाग च्या २० लक्ष रुपये निधी अंतर्गत आय. टि. आय ते कब्रस्थान रस्त्याचे डांबरीकरणाच्या बांधकामांचे भुमीपुजन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ देशपांडे, बेरडी (जुनी) च्या सरपंच मंदाबाई किन्नाके, उपसरपंच रविदास किन्नाके, कार्यकारी अभियंता प्रकाश गायवाड, उपविभागीय अधिकारी राजेश वाघमारे, कनिष्ठ अभियंता तुषार डोंगरे, अशोकराव देशपांडे, भारत रोहने, साईनाथ बतकमवार,गोपाल ठाकरे, भीमराव मेश्राम , रवी त्रिशुलवार , सुनील तेलंग , प्रभाकर येरणे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here