महिला कुस्ती पटुंचे आंदोलन चिरडण्या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.

Ko

लोकदर्शn 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– दिल्ली येथे जंतर-मंतरवर बसलेल्या देशातील ऑलम्पिक मेडल विजेत्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाला चिरडण्याचा काम दिल्ली पोलिसांकडून रात्री करण्यात आले. मुळात संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्काची गळचेपी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांची बाजू ऐकून अत्याचाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी अन्यायग्रस्त महिला कुस्ती पटुंचे आंदोलनच चिरडण्याचा डाव सुरू आहे. पोलीस आणि सरकार ची ही कृती अतिशय निंदनीय आहे. या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांच्या नेतृत्वात संविधान चौक राजुरा येथे स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या पेटवून निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस चे महासचिव प्रणय लांडे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, NSUI शहर अध्यक्ष यश मोरे , युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अशोक राव, अनंता ताजने, युवक काँग्रेस विधान सभा सचिव निरंजन मंडळ, उद्देश लांडे, शुभम खेडेकर, सागर कर्मंनकर यासह मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here