लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील गडचांदूर हे ऐतिहासिक व औद्योगिक नगरी असून कोरपना व जिवती तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे . परिसरात ४ सिमेंट कारखाने असून डब्लू सी एल च्या खाणी सुद्धा आहेत . आजूबाजूचा परिसर आदिवासीबहुल आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शहरात आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह 1993 मध्ये तर मुलांचे 2003 मध्ये शासनाने सुरू केले. कित्येक वर्षांपासून ते किरायाच्या इमारतीत सुरू आहे. आतापर्यंत करोडो रुपये किरायापोटी देण्यात आले आहेत,
आदिवासी मुला मुलींना चांगली राहण्याची सोय व्हावी म्हणून आदिवासी मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती शासनाने केली. वास्तविक बघता सदर वसतिगृह हे शहरात होणे आवश्यक असतांना गडचांदूर शहरापासून ४ किमी अंतरावर राजुरा तालक्यातील इसापूर ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी मुला-मुलींचे शैक्षणिक विकास व प्रगतीसाठी गडचांदूर-पाटण या मुख्य रस्त्यालगत शासकीय जमिनीवर वसतिगृहाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले . मात्र आता या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने या कामासाठी सहा कोटी निधीची तरतूद करून उपरोक्त कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फतीने उपरोक्त जमिनीवर आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहासाठी अद्ययावत सर्व सोयी सुविधायुक्त देखणी इमारती तयार करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने उपरोक्त इमारतीचे बांधकाम सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून ७ एप्रिल २०१७ रोजी कायदेशीर ताबा इमारतीचा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग यांना दिला. शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या दोन्ही इमारती २०१९ पर्यंत सुस्थितीत होत्या. मात्र सन २०२०-२१ वित्तीय वर्षात आदिवासी विकास विभागाच्या दिरंगाई व दुर्लक्षपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे विदारक चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत, या इमारती अद्यावत असताना इमारतीमधील फॅन, इलेक्ट्रिक साहित्य, दरवाजे, खिडक्याच्या काचा, स्टील राॅड, मार्बल टाईल्स सर्व चोरीला गेले आहे. याठिकाणी जुगाराचा अड्डा, दारूच्या खाली बाटल्या पडलेल्या असतात. प्रेमीयुगुलांचे तर हे आश्रयस्थान झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
वसतिगृहाच्या ठिकाणी दोन बोअरवेल मारण्यात आल्या. मात्र, पाणी न लागल्याच्या कारणामुळे सुसज्ज असलेली इमारत धूळखात पडली आहे. पुढे या इमारतींना पिण्याच्या पाण्याच्या सुविधाकरिता बोकुळडोह येथून नळ योजनेतून पाईनलाईन टाकली. ते काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. इमारत बंद अवस्थेत असल्याने बरेच नुकसान झाले आहेत, वसतिगृहाची इमारत बांधून तयार आहे. मात्र, पाण्याची सुविधा नसल्याने ती अद्याप खुली करण्यात आली नाही.
गडचांदुरात शिक्षणासाठी येणाऱ्यां आदिवासी विद्यार्थ्यांना किरायाच्या खोलीतच राहावे लागत आहे. शासनाचे मुला मुलींचे वसतिगृह अजून हि किरायाच्या खोलीतच सुरु असून तेथील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे मुला मुलींचे शैक्षणीक नुकसान होत आहे.
परिसरात जवळच इसापूर , सोनापूर , गोपालपूर , हिरापूर येथे लोकवस्ती असून केवळ आदिवासी मुला मुलींच्या वस्तीगृहालाच पाण्याची सुविधा शासन करू शकत नाही ही वस्तविकता सरकार आणि अधिकाऱ्यांच्या वंचित घटकांच्या विकासाप्रती उदासीनता दर्शवित आहे .
बंद असलेले आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह गडचांदूर ची इमारत पुनश्च सुसज्ज करून येणाऱ्या शैक्षणीक वर्षापासून वापर सुरु करण्यात यावा.यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी
नगर परिषद गडचांदूर चे
आरोग्य व स्वच्छता समिती चे सभापती विक्रम येरणे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे, निवेदनाच्या प्रति आमदार सुभाष धोटे,खासदार बाळूभाऊ धानोरकर, व जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या कडे पाठविल्या आहेत,