प्रदूषणप्रवण सिमेंट उद्योगांनी केली स्थानिकांची निराशा

by : Shankar Tadas
चंद्रपूर जिल्ह्यात सिमेंट उद्योगांमुळे नावारूपाला आलेला कोरपना तालुका प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात सामना करीत आहे. त्यामुळे मानवी आरोग्य व शेतीवर अत्यंत घातक परिणाम दिसून येत आहे. विविध सामाजिक संघटना आणि जाणकार व्यक्तीनी वेळोवेळी प्रदूषणाची समस्या लक्षात आणून दिली तरी फारसा परिणाम होत नसल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. यात भर म्हणजे सिमेंट उद्योगाची संख्या आणि क्षमता दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातुलनेने प्रदूषणमुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे कोरपना तालुक्यातील सामान्य जनतेला या प्रदूषणप्रवण सिमेंट उद्योगांचा लाभ कमी आणि नुकसान अधिक अशीच अवस्था झाली आहे.
सिमेंट उद्योग सुरू करण्यासाठी जे निकष पाळले जातात त्यात प्रदूषणनियंत्रण हा महत्वाचा मुद्दा असतो. मात्र सर्व शासकीय यंत्रणा जणू या उद्योगांना शरण गेल्याप्रमाणे वागतात. निकष निव्वळ कागदोपत्री राहतात. सिमेंट उद्योगातून प्रचंड आर्थिक लाभ प्राप्त करताना स्थानिक लोकांचा कोणताही विचार उद्योजक करीत नाही. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगारांना कामासाठी इतर ठिकाणी भटकावे लागत आहे.
स्थानिक लोकांचा अंत न पाहता सिमेंट उद्योगांनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. स्थानिकांना प्राधान्यक्रमाने रोजगार दिला जावा. सिमेंट उद्योगाची संख्या मर्यादित असावी. तसेच पाण्याचा उपयोग करीत असताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here