महात्मा गांधी विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्यासौ स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे ,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, बी के हस्ते,होते, शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर वर्ग पाचवी ते नववी व अकरावी च्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला तसेच इंडियन स्टॅंडर्ड क्लब च्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन एच बी मस्की यांनी केले, याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here