कोरपना येथील उडान पुल बंद नको पील्र्लर घेऊन खुल्या पुलाची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष ÷नारायण हिवरकर

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा, गडचांदूर, गोविंदपुर ३५३ महामार्गाचे काम सुरु आहे. कोरपना येथे ढोपटाळा फाटा ते भाऊराव पाटील आश्रम शाळा कोरपण्या पर्यंत पॅक बंद उडान पुलाचे बांधकाम होणार आहे या विरोधात भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ही मागणी रेटून धरली असून यात पॅक बंद उडान पुलाची निर्मिती न करता पील्लर बांधकाम करून खुल्या पुलाची निर्मिती करुन व्यापाऱ्यावर होणारा अन्याय टाळावा अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी केली आहे.
३५३ महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. यात उडान पुलाचा खालचा भाग हा पॅक बंद राहणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अनेक व्यापारांचे विविध प्रकारचे दुकाने आहेत. पॅक बंद पुला मुळे व्यापाऱ्यांचे धंद्यावर परिणाम होणार असल्याचे मत हिवरकर यांनी व्यक्त केले. पॅक बंद पुल न बांधता उडान पुलाच्या खाली पील्लर बांधकाम करून खुले उडान पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संबधीत पालकमंत्री,केन्द्रीय मंत्री, खासदार, आमदार व अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here