लोकदर्शन पुणे👉 सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे
आदिवांचा देवदूत म्हणून ओळखले जानारे आदिवांसीचे आसू पुसनारे सर्व धर्म समभाव या विचाराने कांम करणारे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले हे महाराष्ट्रातील प्रत्येक आदिवासी पिढीत दिन दुबळ्याच्या दुःखा मध्ये धावून जातात व त्या पिढीत चेहेऱ्यावर हासु आनतात… संताच्या विचाराची शिदोरी घेऊन राज्यभर काम करत असताना लाखो अदिवासीना न्याय मिळवून दिला अनेकाना घरे मिळवून दिले तर हजारो मुलांना शिक्षणासाठी मदत करुन त्यांना शिक्षणाची दारे खुली करुन दिले..
आज शंकेची दरी निर्माण होऊन झालेला दोन गटातील तणाव शांतते थाबण्यात भोसले यांना यश..
इंदापुर तालुक्यातील कालठण गावामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटात तणाव निर्माण झाला होता तो तणाव आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव भोसले व इंदापुर पोलीस स्टेशन चे वरीष्ट पोलीस निरीक्षक मा.डी.एन.पवार यांच्या मध्यस्थीने मिटवण्यात यश आले… यावेळी महेंद्र रेडके, संजय भोसले, दिलीप भोसले,सचिन भोसले, प्रदीप पवार,दिपक काळे, सतिश पवार,पवन पवार, व कालठण गावचे सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थ, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..